पावसाळ्यात घरात वेगवेगळ्या किटकांसोबत लाल मुंग्या येण्याचे प्रमाण देखील वाढते. ही समस्या खरतर सर्वच ऋतूमध्ये दिसून येते पण पावसाळ्यात मुंग्यांचा सर्वाधिक त्रास जाणवतो.
तुम्हाला सुद्धा घरात वावरणाऱ्या या मुग्यांपासून सुटका करायची आहे. तर हे घरगुती उपाय करू शकता.
तुम्ही घरातून मुंग्या घालवण्यासाठी बोरॅक्स पावडर वापरू शकता. एक चमचा बोरॅक्स पावडर आणि एक चमचा साखर यांचे मिश्रण मुंग्या असलेल्या ठिकाणी फवारणी करा.
मुंग्या गोड पदार्थांवर लवकर येतात. ज्या ठिकाणी मुंग्या आहेत तिथे मीठ टाकल्यास मुंग्यांपासून सुटका मिळते.
पाण्यात व्हिनेगर मिसळून मुंग्यांवर फवारणी केल्यास मुंग्यापासून सुटका मिळते.
घरातून मुंग्या घालवण्यासाठी तुम्ही काळी मिरी देखील वापरू शकता. जिथे मुंग्या दिसतात त्याठिकाणी काळी मिरी पावडर टाका.
मुंग्या घालवण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून मुंग्यांवर फवारा. असे केल्यास मुंग्या निघून जातील. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)