चांगल्या हस्ताक्षरासाठी चांगले पेन निवडणे अत्यंत गरजेचे आहे. हातात योग्य प्रमाणात मावेल अशी पातळ आणि हायटेक रोलरबॉलने लिहिले पाहिजे. पेनामुळे हाताला ग्रिप येतो.
लिहिताना योग्य पद्धतीने सरळ बसणे गरजेचे आहे. लिहिलेली वही फिरवण्यापेक्षा पेन हातात घेऊन तो फिरवत अक्षर सुधारा.
चांगल्या हस्ताक्षरासाठी योग्य पद्धतीच्या पेन प्रमाणेच कागदही निवडणे गरजेचे आहे. जाड पान निवडण्यापेक्षा पातळ हलके पान निवडावे.
अनेकदा घाई गडबडीत लिहिण्यापेक्षा आरामात शांतपणे आणि हळू हळू हस्ताक्षर काढा. जर तुम्ही चांगल्या हस्ताक्षरासाठी प्रयत्नशील असाल तर हे नियम फॉलो करा
तुम्ही दररोज वर्तमान पत्रातील एक पॅरेग्राफ लिहिण्याची सवय लावा. दररोज किमान ५ मिनिटे तरी प्रॅक्टिस करा