काम करताना 20-20-20 या नियमाचा वापर करा. यानुसार तुम्ही दर 20 मिनिटांनी कॉम्प्युटरच्या स्क्रिपासून 20 फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंदासाठी पाहा.
काम करताना थोडावेळ ब्रेक घ्या. जेणेकरुन तुमच्या डोळ्यावरील ताण कमी होईल.
रात्रीच्या वेळी काम करत असताना कॉम्प्युटरचा ब्राईटनेस कमी ठेवा.
कॉम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करावी.
कॉम्प्युटरचा स्क्रिन स्वतः पासून 20-30 इंचावर ठेवा.
कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तींनी दर 2 तासांनी उठून डोळ्यावर थंड पाणी मारावे.
तसेच काही वेळासाठी डोळ्यांना विश्रांती द्यावी.
तसेच शक्य असेल तर कॉम्प्युटर स्क्रीनला अँटीग्लेअर कोटिंग करावे किंवा अँटीग्लेअर चष्मा वापरावा.