'राममय' झालं मुकेश अंबानी यांचं घर, पाहा Antilia चे सुंदर फोटो

Ayodhya मध्ये सोमवारी राम मंदिरातील रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यामुळे संपूर्ण शहर सजलं आहे.

राम मंदिरात आयोजित कार्यक्रमात अनेक बिझनेस सेक्टरमधील दिग्गज व्यक्तींना निमंत्रण पाठवले आहे.

एशियातील सर्वास गडगंज श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स चेअरमन Mukesh Ambani यांना कुटुंबासह आमंत्रण मिळालं आहे.

देशभरात राम मंदिराचा उत्साह असताना अंबानी यांचं घर अँटीलिया दे प्रभू श्री रामाच्या रंगात रंगल आहे.

प्राण प्रतिष्ठेच्या पूर्व संध्येला मुंबईतील मुकेश अंबानी यांचं घर Antilia चे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जे संपूर्णपणे "राममय" झालंय.

27 मजले उंच असलेल्या या देशातील सर्वात महागड्या इमारतीच्या वरच्या भागात राम मंदिराच्या फोटोसोबत 'जय श्री राम' लिहिलेले आहे.

यासोबतच संपूर्ण इमारतीला विशेष सजावट करण्यात आली आहे. रंगीत रोशनाई आणि फुलांनी संपूर्ण इमारत श्री रामाच्या नावाने सजली आहे.

VIEW ALL

Read Next Story