नाकाच्या जवळपास असलेल्या त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल, मृत त्वचा आणि घाण अडकून राहते. त्यामुळे नाकाच्या आजूबाजूला ब्लॅकहेड्स होतात.
नाकावरून हे ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादन आहेत मात्र त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्हाला असा एक घरगुती मास्क सांगणार आहोत ज्यामुळे नाकावरील ब्लॅकहेड्स अगदी सहज निघतील.
घरगुती मास्क तयार करण्यासाठी साहित्य : बेसन, एलोवेरा जेल, बटाट्याचा रस,
सर्वात आधी एका वाटीत आवश्यकतेनुसार बेसन घ्या. मग त्यात ताजे एलोवेरा जेल मिसळा, त्यात थोडा बटाट्याचा रस मिसळा.
तयार झालेलं मिश्रण नीट मिक्स करा आणि मग ते नाकाच्या जवळपास लावा.
घरगुती तयार केलेली ही पेस्ट तुम्ही 5 ते 10 मिनिटे नाकावर लावून ठेवा. मग हळूहळू या पेस्टने नाकावर मालिश करा. यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातील.
नाकावर जास्त ब्लॅकहेड्स असतील तर तुम्ही या पेस्टचा उपयोग नियमितपणे करू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. कोणतीही गोष्ट चेहऱ्यावर किंवा त्वचेवर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. . संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)