कफ आणि खोकला झाल्यावर रात्रीच्यावेळी अनेकदा झोपेवर परिणाम होतो.
दुधाचे पदार्थ खाणे टाळले की कफ होण्याची समस्या कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे घसा स्वच्छ होतो आणि घशाला झालेले संक्रमण कमी होऊ शकते.
खोकला झाला असेल तर झोपण्यापूर्वी गरम पाण्यात निलगिरी किंवा पेपरमिंटचे काही थेंब टाकून त्याची वाफ घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
झोपण्यापूर्वी लिंबू मधात मिसळून त्याचे सेवन केल्याने घशाला आराम मिळतो आणि जळजळ कमी होते. मात्र लहान मुलांना हे मिश्रण देऊ नये याची काळजी घ्यावी.
सुक्या खोकल्यावर आलं हे गुणकारी ठरत. खोकला झाला असेल तर अशावेळी आल्याचा तुकडा तोंडात टाकावा. याविषयी तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन सुद्धा करू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)