तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर अननसाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा.
अननस हे फायबर, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन, थायामिन या पोषक तत्वांनी युक्त आहे.
यामध्ये अनेक घटक असल्यामुळे ह्रदयविकारांपासून बचाव होतो तसेच हाडे मजबूत होतात.
वजन कमी करण्यासाठी अननस हे खूप फायदेशीर आहे. संशोधनानुसार महिलांनी याचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे मिळतात.
तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
अननसात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट देखील साफ होण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)