कणिक मळून ठेवली की काळी पडते? 'या' 5 टिप्स फॉलो करा कणिक राहिल ताजी
कणिक मळताना नेहमी तूप किंवा तेलाचा वापर करावा, त्यामुळे कणिक मऊ आणि बराचं काळ चांगली टिकून राहते.
कणिकेचा मऊपणा टिकून राहण्यासाठी अॅल्युमिनीयम फॉइलचा वापर करावा. अॅल्युमिनीयम फॉइलमध्ये कणिक गुंडाळून ठेवल्याने ती दिर्घकाळ टिकते.
कणिक नेहमी हवाबंद डब्यात ठेवावी , डब्यात कणिक ठेवताना कणिकेला कापडात गुंडाळूनचं ठेवावे.
कणिक ठेवण्यासाठी झिपलॉक बॅगचा देखिल वापर करु शकता. कणिक झिपलॉक बॅगमध्ये ठेवताना त्यातील अतिरिक्त हवा काढून टाका.
कणिक ही थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावी. तुम्ही डब्यात किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये कणिक ठेवली असेल तर ती फ्रिजमध्ये ठेवावी.
पिठाचा ताजेपणा टिकवण्यासाठी पीठ मळताना कोमट पाणी किंवा दुधाचा वापर करु शकता.