घरामध्ये अनेकांना विविध फळ-फुलांची झाडे जोपासण्याची आवड असते. त्यातील बरीचशी ही सक्यूलेंट प्लांट्स असतात कारण अशा झाडांना अधिक काळजी घेण्याची गरज नसते.
सक्यूलेंट झाडांना उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज नसते. परंतु, हिवाळ्यात या झाडांकडे दुर्लक्ष करणे झाडांसाठी धोक्याचे ठरु शकते.
हिवाळ्यात सक्यूलेंट झाडे थंडी सहन करु शकत नाहीत. थंडीमुळे या झाडांची पाने गळू शकतात. मात्र काही गोष्टींकडे लक्ष दिल्याने पानांची गळती आपण थांबवू शकतो.
हिवाळ्यात थंडीपासून झाडांचा बचाव करण्यासाठी झाडांची जागा बदलणे फायदेशीर ठरु शकते. जर तुम्ही झाडे बालकनी किंवा गच्चीसारख्या ठिकाणी असतील तर त्यांना घराच्या आत आणून ठेवा जेणेकरुन त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल.
सक्यूलेंट झाडांना सुद्धा पुरेशा प्रकाशाची गरज असते. त्यामुळे झाडांना पुरेसा प्रकाश मिळेल याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर थंडीपासून बचावासाठी झाडांना जमिनीपासून काही अंतर उंचीवर ठेवा.
हिवाळ्यात सक्यूलेंट प्लांट्सची वाढ थांबते त्यामुळे त्यांना अती प्रमाणात पाणी किंवा खत घालू नका. आवश्यकतेनुसार झाडांना पाणी किंवा खाद्य घाला.
कुंडीतील प्रमाणापेक्षा जास्त पाण्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे झाडांना पाणी घालताना चांगल्या ड्रेनेजची व्यवस्था करा.
हिवाळ्यात सक्यूलेंट रोपांची वाढ थांबते. त्यामुळे हिवाळ्यात रोपांचे या कुंडीतून त्या कुंडीत असे फेरबदल करणे टाळा.
हिवाळ्यात सक्यूलेंट रोपांच्या मेलेल्या किंवा सुकलेल्या पानांची छाटणी करा. असे केल्याने झाडाच्या इतर भागांमध्ये संक्रमण होण्यापासून बचाव होईल.