प्रवासात महिला हमखास करतात 'या' चुका; आताच टाळा

रेल्वे प्रवास

प्रवासाला निघालं असता सर्वांनीच काळजी घेणं अपेक्षित असतं. पण, महिलांना काही गोष्टी प्रकर्षानं टाळाव्याच म्हणजे नंतर अडचणी येणार नाहीत. रेल्वे प्रवास करणार असाल, तर कायमच स्वत:चं सामना आजुबाजूला ठेवा. सामान अजिबात नजरेआड होऊन देऊ नका.

स्टेटस अपडेट

अनेकांच्या मते सोशल मीडिया पोस्टवर आपण कुठे चाललो आहोत, कुठून जाणार आहोत, वगैरे सविस्तर माहिती पोस्ट करू नये. ही सवय महिलांप्रमाणं पुरुष आणि तरुणांनीही टाळावी. अशानं कोणीही तुम्हाला ट्रॅक करू शकतं.

गप्पाटप्पा

सहसा अनेक महिलांना गप्पांची आवड असते. अशावेळी अनोळखी मंडळींशी काहींची सहज मैत्री होते. अशा महिलांनी प्रवासादरम्यान अनोळखी सहप्रवाशांना अवाजवी माहिती देणं टाळावं.

पेपर स्प्रे

प्रवासाला निघत असताना मोबाईल बॅटरी चार्ज ठेवणं अत्यंत महत्त्वाचं. त्याशिवाय सोबत पेपर स्प्रे बाळगणंही तितकंच महत्त्वाचं.

सामान

प्रवासाला निघत असताना सर्वात मोठी समस्या म्हणजे सामान. नको त्या गोष्टींची बॅगेत गर्दी करणं टाळा, जेणेकरून सामान कमी असल्यास तुम्हाल प्रवासाचा अधिक आनंद घेता येईल.

आत्मविश्वास

प्रवासाला निघालं असता चेहऱ्यावर कायम आत्मविश्वास असूद्या. कारण, याच आत्मविश्वासाची तुम्हाला मोठी मदत होईल. कुठंही घाबरल्याचे भाव चेहऱ्यावर आणू नका.

VIEW ALL

Read Next Story