कॅसरोलमध्ये ठेवलेली चपाती ओली होते? तर करा हे '5' उपाय


एकेकाळी असे असायचे की चुलीवर केलेली गरम गरम चपाती कुटूंब एकत्र बसून खात असे.पण बदलत्या काळानुसार सर्वच बदलत जात. आजकाल चपात्या ताज्या राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅसरोलचा वापर केला जातो. ज्यामुळे चपात्या तासाभरानंतरही गरम राहतात.


कॅसरोलमध्ये चपाती ठेवल्याने गरम आणि मऊ राहतात.पण काहीवेळेस त्यात वाफ येऊ लागल्याने चपात्य ओलसर होतात. चपात्या ओल्या होऊ द्यायच्या नसतील तर वापरा 'या' टीप्स


जर तुम्ही चपात्या ठेवण्यासाठी कॅसरोल वापर करत असाल तर चपातीच्या आकाराने मोठा असलेला कॅसरोल घ्यावा ज्यामुळे आतमध्ये तयार झालेली वाफ चपाती ऐवजी बाजूला पडेल.


कॅसरोलच्या आतमध्ये जाळीची प्लेट ठेवल्यास चपात्या ओल्या होण्याची शक्यता कमी असते.


कॅसरोलचा वापर करताना चपाती ठेवण्याआधी त्यामध्ये वर्तमानपत्र किंवा पेपर टॉवेल ठेवल्याने वाफेचे पाणी त्याद्वारे शोषले जाईल आणि चपात्या ओल्या होणार नाहीत.


चपाती कॅसरोलमध्ये ठेवण्यापूर्वी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावी.


चपाती ओली होऊ नये म्हणून अ‍ॅल्यूमिनियम फॉइलवर तूप लावून ठेवावे.

VIEW ALL

Read Next Story