दारु अजिबात चांगली नाही. जी प्यायल्यानंतर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. इतर जीवांवरही त्याचा परिणाम होताना दिसतो.
धरतीवर एक जीव असा आहे की, ज्याच्या मेंदूवर दारुचा काहीच परिणाम होत नाही.
आपण बोलत आहोत, वेस्पा ओरिएंटलिस या जीवाबद्दल. जी एक किटकाची प्रजाती आहे. ज्याच्यावर दारुचा कोणताही परिणाम होत नाही.
रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा जीव नैसर्गिकरित्या अल्कोहोलचेच सेवन करतात. पण त्यांना कोणत्याही प्रकारचा नशा किंवा हँगओव्हर होत नाही.
संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, यामध्ये अल्कोहोल डिहायड्रोजनेज (NADP+) जीनचे अनेक प्रती असतात.
हे सहज अल्कोहोल तोडणारे एंजाइमचे उत्पादन करतात. त्यामुळे यांच्यावर दारुचा कोणताही परिणाम होणार नाही.
हे सहजपणे इथेनॉलचे देखील सेवन करते. हे आहार म्हणून सेवन करतात. यामध्ये फुलांचा रस आणि फळ यांचा देखील समावेश असतो.