वांगी फळ आहेत की भाजी? फळभाजी म्हणू नका उत्तर चुकेल
Interesting Fact : आतापर्यंत बऱ्याचदा आपण वांग्याची भाजी खाल्ली, भाजी केली, भाजी आणली वगैरे क्रियापदं आणि भाजी हे विशेषण वांग्यांपुढे जोडत आलो.
तुम्हाला माहितीये का, तुम्ही ज्या वांग्याला भाजी समजताय किंवा फळभाजी म्हणून संबोधताय ते मुळात एक फळ आहे.
वांगं फळभाजी म्हणून ओळखलं जात असलं तरीही शास्त्रीय गुणधर्मांनुसार ते एक फळच आहे.
कोणत्याही फुलातून ज्यावेळी एखादी गोष्ट तयार होते तेव्हा ती फळ म्हणून ओळखली जाते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फळामध्ये 'बी' असते. हा गुणधर्म नसणारे पदार्थ भाजी म्हणून ओळखले जातात.
फक्त वांगी नव्हे, तर इतरही अनेक भाज्या या गुणधर्मामुळं फळांमध्ये मोडतात, टोमॅटो, कारली, तेंडली ही त्यातलीच काही उदाहरणं.