लिखाणासाठी दर दिवशी पेनाची आवश्यकता असते. पण, कधी तुम्ही पेन व्यवस्थित पाहिला आहे का?
पेनाच्या टोपणावर कायम एक छिद्र असतं. अनेकांच्या मते पेनातील शाईचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी त्यावर छिद्र असतं.
हे झालं एक कारण. दुसरं कारण म्हणजे, अनेकदा लहान मुलं चुकून पेनाचं टोपण तोंडात घालतात.
यामागचा मुख्य हेतू असतो तो म्हणजे गुदमरण्यापासून बचाव करणं.
कोणीही चुकून पेनाचं टोपण गिळल्यास श्वास रोखल्यानं जीव जाण्याचा धोका असतो.
हाच धोका टाळण्यासाठी म्हणून संभाव्य धोका पाहता पेनाच्या टोपणावर लहान छिद्र असतं.