आज कोजागरी पौर्णिमा आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
पण तुम्हाला माहितीये का कोजागरीचा नेमका अर्थ काय?
असं म्हणतात की, कोजागरीच्या दिवशी देवी लक्ष्मी सर्व घरात फिरत असते.
कोण झोपले आहे, कोण जागे आहे हे ती पाहत असते. झोपलेल्या व आळशी लोकांवर ती रागवते
तसंच, जागरण करत असलेल्या लोकांना आशीर्वाद देते. त्यांना सुखी-समाधानी करते.
असं म्हणतता लक्ष्मी जेव्हा प्रत्येकाच्या घरात फिरत असते तेव्हा ती को जागर्ती असं म्हणत असते
को जागर्तीचा अर्थ कोण जागतेय असा आहे. त्यावरुनच कोजागरी हे नाव पडले.
पौर्णिमेच्याच दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते म्हणून या दिवसाला कोजागरी पौर्णिमा म्हणतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)