लग्न हा जीवनातील एक अतिशय महत्वाचा निर्णय ठरतो. या निर्णयामुळं कुटुंब, माणसांची मनं जोडली जातात. नवी नाती तयार होतात.
लग्न करण्याची योग्य वेळ असून, हा निर्णय योग्य वयातच घेण्याचा सल्ला दिला जातो.
लग्नाचा निर्णय घेण्यास वेळ घालवल्यास अनेकदा कुटुंबीयांचा दबाव आणि त्यांचे प्रश्न वाढतात. अनेकदा या निर्णयाला उशीर झाल्यास महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात.
लग्नाला उशीर झाल्यास अनेकदा जोडीदारासमवेत असणारं नातं अपेक्षितरित्या आकारास येत नाही. उलटपक्षी फार कमी वयात लग्न झाल्यास जीवनातील कैक गोष्टींना लोक मुकतात असं काहींचं म्हणणं.
व्यक्तीला समजून घेण्याची समज नसल्यामुळं किंवा समोरच्या व्यक्ती किंवा नात्याची समज न आल्यानं नात्यात अडचणी येण्याची शक्यता असते.
लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी समाज आणि कुटुंबांपेक्षाही ज्या व्यक्तीला हे नातं जगायचं आहे त्याच्यावर अवलंबून असतो. हा निर्णय आणि या निर्णयाचे परिणाम हे व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)