कोणत्याही मानवी शरीरावर केस प्रतिमहिना 1 सेंटिमीटर आणि नखं साधारण 3 मिलीमीटर प्रतिमहिन्याच्या वेगानं वाढतात. काहींच्या बाबतीत मात्र हा वेग तुलनेनं जास्त असतो. यामागची कारणं माहितीयेत?
केस आणि नखं केराटीनपासून तयार झालेली असतात. त्वचेखाली असणाऱ्या मॅट्रीक्स पेशींमुळं त्यांची वाढ होते.
मॅट्रीक्स पेशी जुन्या पेशींना पुढे ढकलताना त्यांना फाटेही फुटत असतात. केसांची वाढही मॅट्रिक्स पेशींपासून होते. ज्या पेशी केसांच्या नव्या पेशींना वाव देतात.
केस वाढण्याचे चार स्तर असतात. anagen, catagen, telogen आणि exogen हे ते चार महत्त्वाचे टप्पे. ही प्रक्रिया एखाद्या चक्राप्रमाणं सुरू राहते.
केस आणि नखांच्या वाढीमध्ये जनुकांची महत्त्वाची भूमिका असते. व्यक्तीनुसार ही वाढ आणि तिचा वेग भिन्न असला तरीही कुटुंबात मात्र यामध्ये साधर्म्य आढळतं. सहसा जुळ्यांमध्ये हा वेग एकसारखा असतो.
व्यक्तीचं वयही केस आणि नखांच्या वाढीवर परिणाम करतं. त्यामुळं अनेकदा वयानुसारही हा वेग कमी-जास्त होत असतो. (वरील माहिती निरीक्षणावर आधारित असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)