ब्रेड, केक यासारखे पदार्थ बनवण्यासाठी यीस्टचा वापर करतात. मात्र यीस्टचा अतिप्रमाणात वापरही घातक ठरु शकतो
यीस्टच्या ऐवजी हे पदार्थ वापरल्यासही तुमचे पदार्थ चविष्ट आणि परफेक्ट होऊ शकतात.
बेकिंग पावडर हा एक प्रकारे leavening agent आहे. हे बेकरी उत्पादन आहे. शक्यतो हे पिठात किंवा कणकेत वापरले जाते.
बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर व दही यासारख्या आल्मयुक्त पदार्थ वापरल्यास कार्बनडाय ऑक्साइड गॅस तयार होतो. यामुळं पीठ फुलते. ही पद्धत ब्रेड, पॅनकेक किंवा केक बनवण्यासाठी प्रभावी आहे.
कार्बोनेटेड वॉटर वापरल्यास पीठात बुडबुडे निर्माण होऊन ते छान आंबतात. तसंच, एक प्रकारचा फ्लेव्हरदेखील येतो.
ताक आणि दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळं बेकिंग सोडा अॅक्टिव्हेट होतो आणि leavening agent प्रमाणे काम करतो. साधारणतः सोडा ब्रेडच्या रेसिपीमध्ये वापरला जातो.
अंड्याचा पांढरा भाग फेटून वापरल्यास पदार्थाला खूप छान चवदेखील येते. साधारणतः केक किंवा पेस्ट्रीमध्ये ही पद्धत वापरली जाते.