पदार्थांमध्ये चव येण्यासाठी लिंबाचा वापर सर्रास केला जातो. पण तुम्हाला माहितीये का लिंबाच्या सालांचाही पुर्नवापर करता येतो.
लिंबाची साले निरुपयोगी म्हणून फेकून देऊ नका कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते. याचा वापर तुम्ही स्वच्छतेसाठी करु शकता.
सर्व प्रथम एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. त्यानंतर यात सात ते आठ लिंबाच्या साली टाका
हे पाणी उकळल्यानंतर त्यात बेकिंग सोडा टाका आणि गॅस बंद करा. आता थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये ओतून ठेवा.
लिंबाच्या सालांचे हे पाणी क्लिनर म्हणून तुम्ही वापरु शकता.
बाथरुमच्या खराब झालेल्या भिंतीवर स्प्रे करुन तुम्ही त्या स्वच्छ करु शकता
तसंच, खिडकीच्या काचांवर पडलेले डागही हे पाणी वापरुन स्वच्छ केल्यास लख्ख स्वच्छ होतील.