श्रावणात अळुच्या पानांची वडी आवर्जुन केली जाते. तीच तीच अळुवाडी खावून कंटाळला असाल तर ही हटके अळुवडी खावून पाहा.
नारळाच्या दुधातील अळुवाडीची आज भन्नाट रेसिपी ट्राय करुन पाहा
अळुची पाने, बेसन सव्वा कप,तांदळाचे पीठ,ओला नारळ,लसूण,हिरवी मिरची,आलं ,कोथिंबीर,मिक्स मसाला
हळद 1/2 चमचा, धणे पावडर 2 चमचे,जीरे पावडर 1 चमचा,गरम मसाला 1 चमचा,ओवा 1/2 चमचा,तीळ 1 चमचा, मीठ चवीनुसार, तुप 1 चमचा
सर्वप्रथम नारळाचे दूध काढून घ्या. त्यानंतर कोथिंबीर,लसूण,हिरवी मिरची,आलं , थोडसं खोबर टाकून मिक्सरला पेस्ट करुन घ्या.
आता एका भांड्यात बेसन ,तांदळाचे पीठ,हळद,धणे पावडर, जीरे पावडर,गरम मसाला, ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून चांगलं एकजीव करुन घ्या.
आता हे मिश्रण अळुच्या एका पानांला लावून घ्या. नेहमीच्या अळुच्या वड्यांना लावतो तसंच वडीसाठी पानं लावून घ्या.
अळुच्या वड्या पाडून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये साजूक तूप घेऊन त्यात नारळाचे दूध टाका आणि त्यात अळुच्या वड्या त्यात ठेवा. पुन्हा वरुन नारळाचे दूध घाला
कुकरच्या दोन ते तीन शिट्टा घ्या. थंड झाल्यावर नारळाच्या दुधातील ही अळुवाडी काढून खायला घ्या.