गोड-आंबट चवीचं अधमूरं दही; कसं कराल? ही आहे Recipe!

दही हे जेवणातील अविभाज्य घटक आहे. अनेक पदार्थांमध्येही दही टाकलं जातं

काही जण विकतचं दही आणण्याऐवजी घरातच दह्याचे विरजण लावतात.

आज आम्ही तुम्हाला दह्याचा एक वेगळाच प्रकार सांगणार आहोत. या दह्याला अधमूरं दही असं म्हणतात

या दह्यामध्ये दुधाची साय जास्त असते तर आंबटपणा कमी. त्यामुळं त्याची चव भन्नाट लागते

अधमूरं दही बनवण्यासाठी दूध थोडसं कोमट करुन घ्या. त्यानंतर एका वाटीत दही फेटून घ्या

आता घरी जमवलेली साय घ्या. साधारण छोट्या डबाभर साय जमलेली असावी.

गरम केलेले दूध त्यात टाका. दूध जास्त नाही घालायचे. या सायीत फेटून घेतलेले दही टाका. व थोडेसे ढवळून घ्या

आता हे दही विरजणासाठी 4-5 तासांसाठी ठेवा, नंतर मऊ भातासोबत खायला घ्या

VIEW ALL

Read Next Story