किचमनध्ये सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लिंबू. भाजीत किंवा सलाड करताना लिंबांचा वापर केला जातो.
काही जण सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबू टाकून पितात. त्यामुळं आठवड्याभराचे लिंबू एकदाच आणून फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात.
मात्र, फ्रीजमध्ये ठेवूनही लिंबू लवकर सुकतात किंवा खराब होतात. मग अशा पद्धतीने लिंबू फ्रीजमध्ये स्टोअर करा.
एका जारमध्ये पाणी भरुन त्यात लिंबू टाका आणि झाकण लावून बंद करा. त्यानंतर हा जार फ्रीजमध्ये ठेवा. या मुळं लिंबू दीर्घकाळापर्यंत फ्रेश राहतील.
लिंबू फ्रीजमध्ये ठेवताना इतर भाज्या किंवा फळांपासून लांब ठेवा नाहीतर लिंबू लवकर खराब होतील.
एका सीलबंद किंवा झिपलॉक बॅगेत स्टोअर करुन ठेवा. हवेच्या संपर्कात न आल्यामुळं लिंबू अधिक काळापर्यंत फ्रेश व रसाळ राहतील.
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून तुम्ही लिंबू फ्रिजमध्ये ठेवू शकता.