घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे चिकन सीख कबाब; फक्त ही एक ट्रिक लक्षात ठेवा!

पाहुणे आल्यावर हमखास चिकन बनवले जाते. पण नेहमी सारखे चिकन बनवण्याऐवजी हा नवीन पदार्थ ट्राय करुन पाहा

साहित्य

चिकन खिमा, व्हिनेगर, आलं-लसूण पेस्ट, मीठ, काळी-मिरी पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल, चाट मसाला

कृती

चिकन सीख कबाब बनवण्यासाठी सगळ्यात आधी चिकन खीमा एका भांड्यात काढून घ्या.

आता त्यात आलं-लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाका.

त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून सगळं नीट एकजीव करुन घ्या

त्यानंतर आता कबाबसारखे आकार करून कमीत कमी 4 तास फ्रीजमध्ये ठेवा

जेव्हा तुम्हाला कबाब करायचे असतील तेव्हा फ्रीजमधून काढून तव्यावर शॅलो फ्राय करुन घ्या

VIEW ALL

Read Next Story