हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते अशावेळी त्वचा मुलायम राहावी यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कापूर याचं मिश्रण त्वचेवर लावू शकता.
खोबरेल तेलामध्ये नैसर्गिकपणे मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात तसेच कापूरचे मिश्रण त्वचेतील आद्रता टिकवून ठेवण्यास मदत करते.
खोबरेल तेल आणि कापूर त्वचेची सूज कमी करण्याचे काम करतात.
तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण ही समस्या दूर करते. तसेच हे मिश्रण त्वचेवर बॅक्टीरिया वाढण्यास प्रतिबंध करते.
कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा स्वच्छ होते आणि डाग देखील दूर होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादी चेहऱ्यावर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावल्याने दूर होतात.
चेहऱ्यावर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावल्याने चेहऱ्यावर चमक येते.
कापूर आणि खोबरेल तेल मिश्रण : एका लहान भांड्यात 1-2 चमचे खोबरेल तेल आणि चिमूटभर कापूर घाला. दोन्ही पदार्थ चांगले मिक्स करा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणता पदार्थ चेहऱ्यावर किंवा त्वचेवर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)