मकर संक्रांत स्पेशलः ऑफिसमध्ये शोभून दिसतील या 6 प्रकारच्या साड्या

Jan 10,2024

यावर्षी मकरसंक्रांतीला कोणत्या डिझाइनची साडी नेसायची हे अजुनही ठरलं नाहीये?

सध्या अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या काळ्या रंगाच्या साड्यांचा ट्रेंड सुरु आहे.

मकरसंक्रांतीला कोणत्या पॅर्टनची साडी नेसायची याबद्दल काही खास डिझाईन्स आज आपण पाहणार आहोत.

काटापदराची साडी

नवीनचं लग्न झालं असेल तर या साड्या शक्यतो नेसल्या जातात. या साड्यांमुळे पारंपारिक लुक येतो.

खणाची साडी

सणासुदिला खणाची साडी ही जास्त प्रमाणात नेसली जाते, या साड्या नेसल्यावर हलक्या आणि दिसायलाही सुंदर दिसतात. या साड्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स आल्या आहेत.

प्रिंटेड ब्लॅक शिफॉन साडी

तुम्ही प्रिंटेड ब्लॅक शिफॉन साडी या मकरसंक्रांतीला नेसू शकता. या डिझाईनची साडी तुम्हाला परफेक्ट लुक देऊ शकते.

कलमकारी ब्लॅक साडी

सध्या कलमकारी साड्यांची फॅशन सगळीकडे पहायला मिळतेय.मकरसंक्रांतीला तुम्ही हा ट्रेंड फॉलो करु शकता.

ओरिसा सिल्क साडी

तुम्ही मकरसंक्रांतीला ऑफिसमध्ये ओरिसा सिल्क साडी नेसून जाऊ शकता. ही तुम्ही सहज कॅरी करु शकता.

गोल्डन बॉर्डर सिल्क साडी

जर तुम्हाला हटके लुक करायचा असेल तर अश्या प्रकारची बॉर्डर असलेली साडी नेसू शकता. यात तुम्ही साधा मेकअप जरी केला तरीही सुंदर दिसू शकता. ही साडी तुम्ही बाहेर जाताना सहज कॅरी करु शकता.

VIEW ALL

Read Next Story