जेव्हा आपण बाजारातून तूप विकत घेतो तेव्हा ते महाग मिळते आणि ते शुध्द असेलच याची काही खात्री नाही. त्यामुळे अनेक लोक घरच्याघरीच तूप काढणे पसंत करतात.
घरी तूप काढण्यासाठी खूप वेळ लागतो. पण आता तुम्ही कुकरमध्येही झटपट सायीपासून तूप तयार करू शकता. चला जाणून घेऊया ही सोपी पद्धत.
रोज निघणारी दुधाची साय अनेक दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली जाते. नंतर त्यापासून तूप तयार केले जाते. साधारतः सायीपासून तूप काढण्यासाठी पॅन किंवा कढईचा वापर केला जातो. पण यापद्धतीने खूप वेळ लागतो.
कुकरमध्ये साय आणि 2 कप पाणी घाला. या दोन्ही गोष्टी चांगल्या मिसळून घ्या. या प्रक्रियेत तुम्हाला बर्फ घालायचा नाही.
आता कुकरचे झाकण लावून घ्या आणि मध्यम आचेवर 2 शिस्ट्ट्या करून घ्या. कुकरमधली वाफ पूर्ण गेल्यावर झाकण उघडा.
त्यानंतर चमच्याने मोठ्या आचेवर शिजवण्यास सुरूवात करा. तूप शिजत असताना ढवळत रहा.
हळू तुम्हाला त्याचा रंग आणि पोत बदलताना दिसेल. खाली घट्ट तूप दिसत असताना गॅस बंद करून तूप गाळून घ्या.
बघा तुमचे घरगुती भेसळरहित शुध्द तूप झटपट तयार आहे.