दूध शाकाहारी की मांसाहारी? 99 टक्के लोक होतो गोंधळ
लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच दूध प्यायला आवडतं. दुधातून अनेक प्रकारचे पोषक घटक आपल्या शरीरासाठी मिळतात.
पण अनेकदा दुधाबाबत वाद सुरू होतात की दूध शाकाहारी की मांसाहारी?
जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, दुधात प्राण्यांचं मांस नसून त्यांच्या शरीरातील नैसर्गिक स्त्राव आहे.
मांसामध्ये हिमोग्लोबिन असते, तर दुधामध्ये प्रथिने, चरबी आणि पाणी यांचं मिश्रण असते, ज्यामुळे ते शाकाहारी मानलं गेलंय.
जनावरांच्या दुग्ध ग्रंथींमधून दूध स्रावित होते, ते मांसाहारी मानले जात नाही. दुधात मांसाप्रमाणे जैविक पेशी नसतात.
गाईच्या दुधाचा हलका पिवळा रंग व्हिटॅमिन ए मुळे असतो. हिंदू धर्मात दूध हे सात्विक आणि शाकाहारी मानलं गेलं आहे.
दुधापासून नवीन जीव निर्माण होत नाही. दूध हे पौष्टिक मानलं जातं. दूध कितीही वेळ उकळले तरी त्यातील पोषक घटक स्थिर राहतात.
अनेकदा दुधाला मांसाहारी म्हणणारे लोक अंड्याचे उदाहरण देतात, जे शाकाहारी लोक खाण्यापासून दूर राहत असतात.
अनेक जण असंही म्हणतात की, अंडी सजीवाला जन्म देते, तर दूध फक्त पोषण देतं.
तज्ज्ञ आणि वैज्ञानिक आधारावर दुधाला शाकाहारी आहाराच्या श्रेणीत धरण्यात आलंय.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)