सकाळी की रात्री दूध नेमकं कधी प्यायला हवं?


दुधाचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.


दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 सारखे अनेक पोषकतत्व आढळतात.


हार्वड स्कुल ऑफ पब्लिक हेल्दनुसार गायीच्या दुधात 87 टक्के पाणी आणि 37 टक्के पोषकतत्व असतात.


दुधात 13 टक्के प्रोटीन ऐवजी फॅट्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स सारखे अनेक महत्वाचे मिनरल्स असतात.


तज्ज्ञांच्या माहितीनुसार एका प्रौढ व्यक्तीने 226 ग्राम म्हणजेच एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहू शकते.


अनेक जण प्रश्न विचारतात की दूध नेमकं सकाळी प्यावं की रात्री.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुधाचे सेवन कोणत्याही वेळी करू शकता. पण रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन केल्यास आरोग्याला अधिक लाभ मिळू शकतात.


झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शांत झोप लागते. कारण दूध हे झोप येणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनला वाढवते.


सकाळी दूध प्यायल्यास लवकर भूक लागत नाही. परंतु काहींना दुधाच्या सेवनामुळे ब्लॉटिंग किंवा गॅसची समस्या होऊ शकते, तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दररोज दुधाचे सेवन करावे.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story