'ही' 5 कामं करणाऱ्या महिलांचं म्हातारपण लवकर दिसू लागतं

Jan 08,2025

वाढतं वय

वाढतं वय ही एक सामान्य स्थिती असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येज मानवाचं वय वाढतच असतं. पण, काही सवयी मात्र वाढत्या वयाचा वेग मात्र कमी करतात.

वाढत्या वयाची लक्षणं

एका अहवालानुसार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वाढत्या वयाची लक्षणं लवकर दिसू लागतात. यास कारणीभूत ठरतात त्या म्हणजे काही सवयी. यापैकी एक म्हणजे व्यायाम न करणं. या सवयीमुळं स्नायू आणि हाडांना बळकटी मिळते.

सतत चिंतेत असणं

सतत चिंतेत असणाऱ्या महिलांचा ताण वाढतो आणि मग चेहऱ्यावरील सुरकुत्या, पांढरे केस, थकवा अशा समस्या सतावू शकतात. सततच्या तणावामुळं शरीराला यातून सावरण्याचा वेळ देता येत नाही.

सतत त्रागा करणं

सतत चिडचीड करण्यानं हार्मोनल इम्बॅलेन्स होतो. ज्यामुळं वाढतं वय चेहऱ्यावर दिसू लागतं. यातूनच उच्च रक्तदाब आणि हृदयविकारही डोकं वर काढतात.

कमी पाणी पिणं

त्वचेतील तजेला कायम ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळं कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळंही म्हातारपण लवकर दिसू लागतं.

कमी झोप घेणं

ज्या महिलांची झोप पूर्ण होत नाही, त्या सर्व महिलांचं वय फार लवकर दिसून येतं. त्यामुळं झोप पूर्ण झालीच पाहिजे. अन्यथा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं, डोळ्यांना सूज येणं अशा समस्या सतावतात. (वरील संदर्भ सामान्य माहितीच्या आधारे घेण्यात आले असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story