साप हा पृथीवरील सर्वात विषारी प्राणी आहे असं म्हंटल जातं. सर्पदंश झाल्यावर योग्यवेळी उपचार न केल्यास माणसाचा मृत्यू होतो.
पण जगात असे 7 प्राणी आहे ज्यांच्यावर सापाचं विष परिणाम करू शकत नाही. अशा प्राण्यांबद्दल जाणून घेउयात.
हेजहॉग हा असा एक प्राणी आहे ज्याच्यात स्नायूंमध्ये एक प्रकारचे प्रोटीन असते, ज्यामुळे सापाने दंश केल्यावरही विषाचा हेजहॉगवर कोणताही परिणाम होत नाही.
हनी बॅजर हा प्राणी त्याचे दाट केस, मजबूत त्वचा आणि गतिशीलपणा इत्यादींमुळे हे प्राणी साप चावण्यापासून वाचतात. हनी बॅजर याची प्रतिकारशक्ती चांगली असते.
मिरकट हा पृथ्वीवरील असा प्राणी आहे जो कोब्रा तसेच विंचू सारख्या विषारी प्राण्यांच्या दंशापासून वाचू शकतो.
मुंगूस हा प्राणी अनेकदा ग्रामीण भागात आढळतो. मुंगूस हा प्राणी सापांवर हल्ला सुद्धा करू शकतो आणि सापाच्या विषाचा परिणाम त्याच्यावर होत नाही.
ओपोसम या प्राण्याच्या रक्तातील प्रथिने सापांच विष निषभ्र करू शकतात.
सेक्रेटरी पक्षी हे विषारी सापांची शिकार करण्यात निपुण असतात. या पक्षांवर सापांच्या विषाचा प्रभाव पडत नाही.
रानडुक्कराच्या काही प्रजातींवर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही. त्यांच्या जाड त्वचेमुळे सापांच्या दंशापासून त्यांचे संरक्षण होते. रानडुक्कर लहान सापांची शिकार करतात आणि त्यांना खातात.