बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम

Apr 01,2024

मध्येमध्ये न बोलणं

दोन व्यक्ती बोलत असताना त्यात आपण बोलणं सुरु करू नये याची शिकवण मुलांना कमी वयातच द्या. आपला मुद्दा मांडण्यासाठी वेळ दिली जाते हे त्यांना पटवून द्या.

प्रतीक्षा आणि संयम

कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा न दाखवता आपली वेळ येण्याची प्रतीक्षा करणं आणि संयम ठेवणं हे संस्कार मुलांना द्या.

चांगली भाषा

इतरांशी संवाद साधताना कायम सामंजस्यानं आणि आदरार्थी बोलण्याचे संस्कार मुलांवर कमी वयातच करा.

मिळून मिसळून वावरणं

डबा खाणं असो किंवा खेळणी खेळणं असो, आपल्यासोबतच्यासमवेत मिळून मिसळून वावरण्याचे संस्कार मुलांना द्या.

पसारा आवरा

आपण केलेला पसारा, मग तो खेळण्यांचा असो किंवा इतर कोणता. तो स्वत: तेव्हाच्या तेव्हा आवरण्याची सवय मुलांना लावा.

परवनगी घ्या

कोणतीही गोष्ट करण्याआधी तिथं असणाऱ्या व्यक्तीची परवानगी घेण्याचं वळण मुलांना वेळीच लावा.

VIEW ALL

Read Next Story