मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत.
मुलांच्या अभ्यासासाबोत तुमच्या आवडी आणि फिजीकल फिटनेस महत्त्वाचा आहे.
अंबानी कुटुंब हे परंपरेला खूप महत्त्व देतात आणि त्यांनी त्यांच्या मुलांना देखील सांगितलं.
कोणत्याही गोष्टीवर तुमचे विचार मांडावे त्याविषयी तुम्हाला काही गोष्टी खटकत असतील तर ते सगळ्यांसमोर कसं चांगल्या पद्धतीनं मांडावं हे मुलांना शिकवतात.
मुकेश आणि नीता अंबानी हे कुटुंब कसं एकत्र ठेवता येईल आणि प्रोफेश्नल बॉन्डिंगही किती महत्त्वाची असते यावर भर देतात.
आपला जन्म हा कोणला काही तरी देण्यासाठी झाला आहे. त्यामुळे गरजुंची नेहमी मदत करायची यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना अनेक सोशल अॅक्टिव्हिटीज करण्याविषयी शिकवलं.
कितीही श्रीमंत असले तरी त्यांनी त्यांच्या मुलांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे याचा निर्णय घेण्यास सांगितलं अर्थात त्यांनी पुढे जाऊन बिझनेसच करावा असं नाही.