मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते
सुरूवातीला 13 ते 15 व्या वर्षी मासिक पाळी सुरू व्हायची तर आता वयाच्या ९ व्या वर्षी मासिक पाळी सुरू होते.
लहान वयात मासिक पाळी येणे ही गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.
जामा नेटवर्क ओपन जर्नलच्या संशोधनानुसार, एखाद्या मुलीला 12 वर्षांच्या आधी मासिक पाळी सुरू झाली तर तिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका 20% ने वाढतो.
मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. यामुळे मुलींना हृदयविकार, लठ्ठपणा, गर्भपात आणि मृत्यूचा धोका असू शकतो.
संशोधकांच्या मते, मुलींना लवकर मासिक पाळी येण्याची अनेक कारणे असू शकतात, जाणून घेऊया लहान वयातच मासिक पाळी का सुरू होते.
लहानपणापासून लठ्ठ असलेल्या मुलींना लवकर मासिक पाळी येण्याचा धोका जास्त असतो.
तणावामुळे लहान वयातही मासिक पाळी येऊ शकते.
फास्ट फुड किंवा अनहेल्दी पदार्थांचे सेवन अतिप्रमाणात केल्यास त्याचा परिणाम मासिक पाळीवर होऊ शकतो