15 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरूवात होत आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू असणार आहे. शारदीय नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभ मानले जातात.
नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणतेही शुभ कार्य करण्यास परवानगी असते.
नवरात्रीच्या दिवसात घरामध्ये मनी प्लांटचे रोपणे लावणे शुभ असते. यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात.
तुळशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते. पैशाची कायम भरभराट असते.
नवरात्रीत केळीचे रोप लावल्याने शुभ गोष्टी कानी पडतात. दर गुरूवारी पाण्यात थोडे दूध मिसळून रोपाला अर्पण करावे.
शंखपुष्पी ही औषधी वनस्पती आहे. नवरात्रीत शंखपुष्पीचे रोप लावावे. महत्त्वाच म्हणजे हे रोप लाववल्यास शुभ मानले जाते. चांदीच्या डब्यात रोप लावावे.
घराच्या आवारात नवरात्रीमध्ये प्राजक्ताचे झाड लावल्यास आर्थिक परिस्थिती चांगली होते.