आजच्या धावपळीच्या काळात जंक फुडचे सेवन करणे खूप वाढले आहे.
अशावेळी जंकफुडपेक्षा भूक लागल्यावर पौष्टिक लाडू खाल्ल्याने दिवसभराची उर्जा मिळते. याची रेसिपी जाणून घ्या.
सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, अळसी, तीळ, नाचणी पीठ, तूप, गूळ, खजूराची पेस्ट,पाणी, वेलचीपूड
सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये सर्व बिया भाजून घ्या. या बिया भाजल्यानंतर त्या मिक्सरमध्ये चांगली पावडर करुन घ्या.
त्यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यात नाचणीचे पीठ भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर एका भांड्यात हे पीठ काढून घ्या
आता पुन्हा एकदा पॅनमध्ये तूप टाका आणि त्यात गूळ आणि खजूराची पेस्ट टाकून चांगलं एकजीव करुन घ्या
आता बियांची पावडर, नाचणीचे पीठ आणि गूळ-खजूराची पेस्ट हे मिश्रण एकजीव करुन घ्या. मिश्रण थोडं थंड झाल्यावर लाडू वळून घ्या.
एका एअरटाइट डब्यात हे लाडू भरुन ठेवा. चांगले महिनाभर हे लाडू टिकतात.