गडकिल्ल्यांचे अभ्यासक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य रघुवीर आणि मयुर टकले यांना पाहणीदरम्यान मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्नाळा किल्ल्यावर एक भुयार आढळलं.
पुरातत्त्वं विभागाला त्यांनी तातडीनं यासंदर्भातली माहिती दिली. ज्यानंतर या किल्ल्यावर आधीपासूनच दोन भुयारं असल्याची बाब अधोरेखित झाली.
किल्ल्यावरील निसरड्या वाटा, ढासळणारा भाग या आणि अशा गोष्टींची पाहणी आणि उपाययोजनांचीच चाचपणी करण्यासाठीचा निधी मिळाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलं असता हे नवं भुयार आढळलं.
याआधी सापडलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या भुयारापुढेच साधारण 80 फुटांच्या कातळाला लागून एका कडेला हे भुयार आहे.
आतल्या बाजूला हे भुयार साधारण 10 फूट असल्यातं सांगितलं जात असून, त्यातील मातीचा गा ळ काढल्यानंतरच प्रत्यक्षातील खोली लक्षात येईल असं जाणकारांचं मत.
या प्राचीन भुयारासंदर्भातली माहिती समोर येईल तेव्हा अनेक खुलासे होतीलच. पण, यंदाच्या वर्षी कर्नाळ्याचा ट्रेक आकर्षणाचा विषय असेल हे मात्र नक्की.