PCOD आणि PCOSमुळं मासिक पाळी अनियमित येणे ही समस्या अनेक महिलांना असते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे.
आम्ही आज तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत. हा लाडू खाल्लास मासिक पाळीवर नियमित होते.
सूर्यफुलाच्या बिया, तिळ, आळशी, भोपळ्याच्या बिया, वेलची पावडर, खजूर, मध,
सगळ्यात पहिले सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तिळ, आळशी हे सर्व दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या.
त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात सर्व भाजलेले साहित्य आणि खजूर, वेलची पावडर टाकून बारीक करुन घ्या
हे सर्व साहित्य एका भांड्यात काढा व त्यावर दोन चमचे मध टाका. त्यानंतर लाडू वळायला घ्या
हे लाडू तुम्ही दिवसातून एकदा खावू शकता. त्याचबरोबर व्यायमही आवश्यक आहे.
हे लाडू खाल्ल्याने तुमचं वजनही वाढू शकतं त्यामुळं दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)