कोल्डड्रिंक की सोडा... दारुसोबत काय जास्त धोकादायक? जाणून घ्या
सर्वसामान्यपणे भारतातील अनेक मद्यप्रेमी हे दारु पिताना पाणी, सोडा किंवा कोल्डड्रिंक्स मिसळतात.
पण दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा मिसळण्याचे कारण काय? आणि यातील सर्वात जास्त धोकादायक काय? हे आपण जाणून घेऊ.
दारुची चव ही कडू असते. या कडूपणाचा समतोल साधण्यासाठी त्यात पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा मिसळला जातो.
सोडामध्ये कार्बन डायऑक्साईडसोबत फॉस्फोरिक अॅसिड असते. ज्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण हळूहळू कमी होते.
यामुळे तुमच्या शरीरातील हाडे कमकुवत होतात आणि ती तुटू शकतात.
तर दुसरीकडे कोल्डड्रिंकमध्ये साखर अतीप्रमाणात असते. त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेमध्ये वाढ होते.
दारुसोबत कोल्डड्रिंक मिसळून प्यायल्याने शरीरातील साखर वाढते आणि परिणामी आपल्याला जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करता येत नाही.
त्यामुळेच दारुसोबत सोडा मिसळून पिणे जास्त धोकादायक असते.