सकाळी आणि संध्याकाळी चहा पिताना सोबत काहीतरी खाणं होत असतं. पण असे काही पदार्थ आहेत जे चहासोबत खाल्याने त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होतो.
चहा पिताना सोबतच मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त वाढतं.
जर तुम्ही चहा सोबत पेस्ट्री किंवा गोड काहीही खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्य़ाने वाढते.
बटाटा चिप्स् आणि सॉल्टेज नट्स यात सोडीयमचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे जर चहा सोबत खाऱ्या पदार्थांचं सेवन केल्यास रक्तदाबासंबंधीत आजार होतात.
चहासोबत आंबट फळं खाणं हे शरीरासाठी घातक आहे. संत्रीसारख्या लिंबासारख्या फळात मोठ्या प्रमाणातअॅसिड असतं. त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता असते.
क्रीम रोल्स किंवा क्रिमी पदार्थ चहासोबत खाल्ल्याने ते पचायला जड जातात, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढण्याची समस्या होते.
चहा पिण्याआधी किंवा चहा पिऊन झाल्यानंतर थंड पदार्थ खाणं टाळावं. थंड खाऊन त्यावर गरम चहा प्यायल्याने पचनाशी संबंधीत ,समस्या उद्धवतात. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)