वातावरणातील बदलांमुळे सारखी लघवीला होते. परंतू ही समस्या जर तुम्हाला नेहमीच होतं असेल तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
डायबिटीज असलेल्या रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल वाढल्यामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य उपयोग करू शकत नाही. ज्यामुळे सारखी लघवीला होते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
इंटरस्टिशियल सिस्टिटिसच्या कारणाने मुत्राशयाची जागा संवेदनशील होते, ज्यामुळे सारखी लघवीला होते.
युरिनरी ट्रॅक इंफेक्शनमुळे देखील सारखी लघवीला होण्याची समस्या होते. खासकरून महिलांना ही समस्या जास्त होते. ज्यामुळे प्रायव्हेट पार्टला जळजळ होऊ शकते.
सारखी लघवीला होणे हे वाढलेल्या प्रोस्टेटचे देखील लक्षण असू शकते. अशी समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डायबिटीजच्या रुग्णांनी काही दिवसांच्या अंतराने ब्लड शुगर लेव्हल तपासली पाहिजे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा . संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)