चहा आपल्या पचन तंत्राला साल्विया, पित्त आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यास मदत करतो. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असल्याने हे शक्तीशाली अॅंटी-इंफ्लेमेटरीसारखं काम करतं. ज्याने पचनक्रियेशी संबंधित अनेक कमतरता पूर्ण केल्या जातात.
काही रिसर्च हे सांगतात की, चहामध्ये असणारं फेनोलिक तत्व आपल्या पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडचण निर्माण करतं.
असे म्हटले जाते की, जर जेवणासोबत तुम्हला चहा हवा असेल आहारात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला होणारा त्रास टाळला जाईल.
आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी जेवताना चहा घेऊ नये. असंही आढळलं आहे की, जेवणादरम्यान चहा प्यायल्याने शरीरात कॅटचिनची कमतरता होते.
कॅटलिन चहामध्ये आढळणारं एक तत्त्व आहे. ज्याचा आपल्या अनेक सायकॉलॉजिकल कामात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
तुम्हाला जेवणासोबत चहा प्यायचाच असेल तर ग्रीन टी किंवा जिंजर टी घेऊ शकता. कारण याने पचनक्रियेला मदत मिळते.