हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या रोपांची घ्या विशेष काळजी, 'या' 6 टिप्समुळे झटपट वाढेल रोप

Jan 03,2025


हिवाळ्यातील वातावरण गुलाब रोपांच्या योग्य वाढीसाठी धोकादायक ठरू शकते. अशा वेेळी 'हे' 6 उपाय करणे रोपांसाठी फायदेशीर ठरेल.

उपाय 1

संक्रमित देठासहित कोणतीही किडलेली किंवा शुष्क पानांची चांगल्या प्रकारे छाटणी करा.

उपाय 2

योग्य प्रमाणात खत घाला. शेणखत, वर्मी कंपोस्ट आणि फॉस्फरस यांसारख्या वस्तू वापरू शकता.

उपाय 3

गुलाबाच्या मुळांना ईजा केल्याशिवाय माती खणा आणि दुसरी माती घाला. ज्यामुळे मातीतील ऑक्सीजनची पातळी स्थिर राहील.

उपाय 4

कित्येकदा गुलाबाच्या रोपांवर केळे डाग होतात. अशा वेळी जैविक किटनाशक किंवा घरगुती कडू लिंबाच्या तेलाची फवारणी करा.

उपाय 5

हिवाळ्यात वातावरणात थंड हवा असते. त्यामुळे पाणी कमी प्रमाणात टाका.

उपाय 6

सूर्यप्रकाश कोणत्याही रोपासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळं गुलाबाच्या रोपाला किमान सहा तास सूर्यप्रकाशात ठेवा.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story