अळूची पानांमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि ऑंटी ऑक्सिडन्ट जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.
अळूची भाजी ही रानटी आणि लागवड केलेली अशा दोन प्रकारची असते. आळूची पाने दिसायला कमळासारखी आणि देठ लांब असतात.
अळूच्या पानांतील पोषक तत्वे तणाव दूर करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो.
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
अळूचे पान खाल्ल्याने पोटातील समस्या आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करते.
दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्याने सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
अळूच्या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.