आपण सगळ्यांपेक्षा हटके, स्लिम आणि फिट दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं.
यासाठी असे काही ब्लाउज डिजाइन आहेत ज्यामुळे तुम्ही सगळ्यात हटके आणि आकर्षक दिसाल
जर तुम्ही सिल्कची साडी परिधान करणार असाल तर, तुम्ही फुल स्लीव असलेले ब्लाउज ट्राय करू शकता.
ब्लाउज शिवताना गळ्याच्या डिजाइनकडे जास्त लक्ष द्या. व्ही नेकचा गळा असल्यास तुम्ही स्लिम दिसाल.
जर तुम्ही प्लेन साडी घालत असाल तर, तुम्ही क्रॉचेट ब्लाउज ट्राय करू शकता.
स्टोन असलेल्या किंवा ब्रासोच्या साड्यांवर तुम्ही मिड लेंथ असलेले ब्लाउज घालू शकतात.
जर तुम्ही कॉटनची साडी परिधान करणार असाल तर तुम्ही मिड लेंथ ब्लाउजसोबत डीप नेकचे डिजाइन ट्राय करू शकता.
नेट आणि सुपर नेटच्या साड्यांवर तुम्ही फुल लेंथ ब्लाउज आणि मागच्या बाजूला डीप नेक किंवा बॅकलेस ब्लाउज स्टाईल करू शकता.
कोणत्याही ब्लाउजमध्ये स्लिम आणि फिट दिसण्यासाठी उभी डिजाइन असलेले पॅटर्न निवडा. यासोबत खूप बंद गळा किंवा आखूड स्लीव घेणे टाळा.