थंडीत लोक वॉशिंग मशीनमध्येच कपडे धुतात. वॉशिंग मशीनमध्ये जाड चादरी, पांघरून, लोकरीचे किंवा जाड कपडे धुतले जातात.
अशा वेळेस अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे खराब होण्याची शक्यता असते. काही कपडे तर चक्क फाटतात. अशा स्थितीत काय करावे, हे पाहूयात.
यासाठी ही एक ट्रिक आहे ज्यामुळे तुमचे कपडे वॉशिंग मशीनमुळे कधीच खराब होणार नाहीत आणि अगदी सोप्या पद्धतीने कपडे धुतले जातील.
कपडे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये वॉशर बॉल्स टाकावेत. त्यामुळे कपडे खराब होत नाहीत.
ते वापरण्यासाठी प्रथम वॉशिंग मशीनमध्ये कपडे घाला. नंतर पाणी आणि डिटर्जंट घाला. त्यानंतर वॉशर बॉल्स टाका.
वॉशर बॉल्स कपड्यांना वापडे होण्यापासून किंवा गुंता होण्यापासून दूर ठेवतात. हे बॉल्स वापरल्यामुळे कपड्यांची गुणवत्ता देखील अधिक काळ टिकून राहते.