नियमित अगरबत्ती वापरणं ठरू शकतं नुकसानकारक

आपल्याकडे जवळपास सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर अगरबत्ती वापरली जाते. काहीजण पूजेशिवाय घराला सुगंधित करण्यासाठी देखील अगरबत्तीचा वापरतात.

याच्या वापराने मनाला शांती मिळते कारण त्याचा सुगंध अतिशय अल्हाददायक असतो पण तुम्हाला माहित आहे का अगरबत्तीच्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

अगरबत्ती म्हणजे सुगंधी द्रव्य वापरून लिंपलेल्या काड्या.जेव्हा अगरबत्ती जाळली जाते तेव्हा फॉर्मल्डिहाइड, बेंझिन, टोल्युइन, जाइलीन आणि हानिकारक कण वायूद्वारे बाहेर पडतात.

2008 मध्ये झालेल्या संशोधनानुसार या कणांचे प्रमाण सिगारेटमधून निघणाऱ्या धुरापेक्षा 4.5 पट अधिक असल्याचे सांगितले गेले.

अगरबत्तीमधून निघालेले कण हे विषारी आहेत. जे सहजपणे फुफ्फुसात आणि रक्तप्रवाहात प्रवेश करतात .दीर्घकाळ अगरबत्तीचा संपर्कात आल्यास हृदयाशी संबंधित मृत्यूदेखील होऊ शकतो.

जर घरात कोणाला श्वसनाचा,अस्थमाचा किंवा कर्करोगाचा त्रास असेल तर अगरबत्तीचा वापर टाळा.

त्याचबरोबर अगरबत्ती जाळल्याने डोकेदुखी, सर्दी , खोकला, डोळे आणि नाक, एलर्जीची प्रतिक्रिया आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story