जगभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जात आहे. यात वेगवेगळे डे साजरे केले जातात.
या आठवड्यात चॉकलेट डे, रोज डे, हग डे, प्रॉमिस डे, टेडी डे याबरोबरच किस डे ही साजरा केला जातो.
व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस हा किस डे म्हणून साजरा होतो. पाश्चात्य देशात किस करुन आपलं प्रेम व्यक्त केलं जातं.
आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटीईन डेच्या एकदिवस आधी किस डे येतो. कपलसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो.
या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना किस करत आपलं एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करतात. या दिवशी भेटवस्तूही दिल्या जातात.
KISS ला हिंदी आणि मराठीत चुंबन असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहित आहे पाकिस्तानात KISS ला काय म्हणतात.
पाकिस्तानात उर्दू भाषा बोलली जाते. उर्दूत KISS ला 'बोसा' असं म्हटलं जातं.