पैसे ठेवण्यासाठी जे पाकीट तुम्ही वापरता त्याचा रंग हा अत्यंत महत्वाचा ठरतो.
वास्तूशास्त्रामध्ये कोणत्या रंगाचं पाकीट वापरावं ज्यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही याविषयी सांगण्यात आलं आहे.
वास्तूशास्त्रानुसार जर तुम्ही लाल रंगाचं पाकीट ठेवले तर ते धन आकर्षित करते.
तुम्ही खिशात निळ्या रंगाचे पाकीट सुद्धा ठेऊ शकता, हा रंग स्थिरता आणि विश्वासाचं प्रतीक आहे. यामुळे सुद्धा धनाची कमतरता होत नाही.
काळा रंग हा समृद्धी, धन आणि करिअरसाठी चांगला मानला जातो. तेव्हा काळ्या रंगाचं पाकीट सुद्धा तुम्ही वापरू शकता.
धनाच्या बाबतीत काळ्या रंगाचं पाकीट वापरल्याने त्यात नेहमी पैसे येत राहतात.
वास्तूशास्त्रानुसार तुम्ही हिरव्या रंगाचे पाकीट सुद्धा वापरू शकता. हिरव्या रंगाचं पाकीट खिशात ठेवणं शुभ मानलं जातं.
वास्तूशास्त्रानुसार तुम्ही खिशात चॉकलेटी रंगाचं पाकीट सुद्धा ठेऊ शकता. यामुळे पैशांची उधळपट्टी होत नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)