अक्रोडमध्ये असलेले ओमेगा ३, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा अक्रोडचे स्क्रब लावा. यामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होतात.
त्वचेवरील डाग दूर करायचे असल्यास अक्रोडचा फेस पॅक लावा. 2 चमचे अक्रोड पावडरमध्ये थोडे खोबरेल तेल, 1 चमचे गुलाबजल, 1 चमचे मध मिसळा आणि पेस्ट बनवा.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन बी 5 आणि ई असते, ज्यामुळे हायपरपिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते.
अक्रोड हे तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. याचे तेल लावल्याने कोरडी, निस्तेज त्वचा पुन्हा छान होण्यास मदत होत.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)