जीन्स घालण्याची फॅशन आता खूप कॉमन झाली आहे. अनेक देशातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकं जीन्स घालतात.
मात्र जगात असा एक देश आहे जिथे जीन्स घालणं हा गुन्हा आहे.
हा देश दुसरा तिसरा कोणता नसून उत्तर कोरिया हा आहे.
1948 मध्ये उत्तर कोरियाने अमेरिकेमुळे जीन्सवर बॅन लावला. जीन्सला अमेरिकेच्या साम्राज्यवादाचं प्रतीक मानलं जातं.
अमेरिका आणि उत्तर कोरिया हे दोन्ही देश एकमेकांचे दुश्मन मानले जातात. म्हणूनच उत्तर कोरियाने जीन्स घालण्यावर बंदी आणली.
द सनच्या वृत्तानुसार, जर कोणी उत्तर कोरियामध्ये जीन्स घातलेला दिसला तर त्याला तात्काळ अटक केली जाईल.
केवळ जीन्स नाही तर उत्तर कोरियामध्ये इतर अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
कोरियातील कोणतीही व्यक्ती आपले केस रंगवू शकत नाही. तसेच, पाश्चिमात्य ब्रँडचे शर्ट घालण्यावर तेथे बंदी आहे.
उत्तर कोरियाचा किम जोंगने देशात लेदर जॅकेटवरही बंदी घातली आहे. तसेच शरीराच्या कोणत्याही भागावर पियर्सिंग करण्यावर सुद्धा बंदी आहे.